Ad will apear here
Next
नागरिकांकडून ‘व्होट फॉर स्ट्राँग गव्हर्न्मेंट’ अभियान
पत्रकार परिषदेत माहिती देताना (डावीकडून) मिलिंद भागवत, नचिकेत भंडारी, विलास रबडे, यशवंत घारपुरे व अभय भंडारी.

पुणे : आपण प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावला, तर देशात एक सक्षम सरकार येऊ शकते. यासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. हा संदेश देण्यासाठी पुणे शहरातील जबाबदार नागरिकांनी एकत्र येत ‘व्होट फॉर स्ट्राँग गव्हर्न्मेंट’ अभियान सुरू केले आहे. 

नागरिकांशी संवाद साधून मतदान जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी या अभियानाचे सदस्य यशवंत घारपुरे, विलास रबडे, मिलिंद भागवत, अभय भंडारी, नचिकेत भंडारी, रवींद्र खाडिलकर आदींनी पत्रकार परिषद घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. 
 
या वेळी यशवंत घारपुरे म्हणाले, ‘शिपायाची नोकरी करण्यासाठीही दहावी-बारावी शिक्षण असावे लागते. मात्र, राज्याची धुरा सांभाळणाऱ्या राजकारण्यांना शिक्षणाची अट नाही. लोकशाहीच्या नावाखाली निरक्षर लोकांना निवडून द्यावे का हा विचार केला पाहिजे. राजकारण किंवा सगळेच राजकारणी वाईट नाहीत. त्यात अनेक चांगले आणि धडपडीने काम करणारे आहेत. तेव्हा चांगल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित राजकारण्याला निवडून देण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारी राजकारण्यांना दूर ठेवायचे असेल, तर आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान करणे सोडल्यामुळे आणि निवडणुकीची सुट्टी फिरायला जाण्यात घालवणे यामुळे आजची राजकीय परिस्थिती उद्भवली आहे. त्याचाच फायदा घेऊन मूठभर राजकारण्यांनी राजकारण बदनाम केले शिवाय देशाच्या प्रगतीत खोडा घातला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्याला समस्या सोडवाव्यात, आपल्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत, असे वाटत असले, तर आपण प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. तेव्हा जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. मनाशी पक्के करा की यंदा मतदानाचा हक्क बजावणारच. उमेदवार निवडताना त्याचे शिक्षण, त्याची सामाजिक जाणीव, निष्ठा, प्रामाणिकपणा  तपासून बघा. तुमचे मत अमूल्य आहे. ते देताना नीट विचार करून द्या. चांगला आणि सुयोग्य उमेदवार निवडा’.

विलास रबडे म्हणाले, ‘योग्य व्यक्तीला मतदान करा व चांगल्या सरकारची अपेक्षा करा. आम्ही जनतेने शंभर टक्के मतदान करावे म्हणून एक लाख बिल्ले तयार केले आहेत. या बिल्यावर ‘Vote for strong government and protect Nation’, ‘योग्य उमेदवाराला चांगले सरकार बनविण्यासाठी मतदान करा व देश अपात्र व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या उमेदवारापासून वाचवा’ असा संदेश छापला आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सभासद नाही. फक्त चांगले सरकार निवडून येण्यासाठी लोकांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न करत आहोत. भेटेल त्याला मतदान करण्याचे आवाहन केले जात असून, खेड्यामध्ये जाऊनही याबाबत जनजागृती केली जाणार आहे. सध्या एकूण २० ग्रुप वेगवेगळ्या भागात काम करत आहेत’.


या मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क : ९८२२५ ०२०७८, ९८२०० २६२६५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZJLBY
Similar Posts
योग्य लोकप्रतिनिधी निवडीसाठी मतदारांना मार्गदर्शनपर चर्चासत्र पुणे : सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध राजकीय पक्ष आपले जाहीरनामे घेऊन नागरिकांना भुलवत आहेत. या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून, नवीन संसदेकडून काय अपेक्षा ठेवाव्यात, याचे मार्गदर्शन मतदारांना करण्यासाठी सजग नागरिक मंचाने नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चर्चासत्र आयोजित केले आहे
पुणे, बारामती मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक नियुक्त पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, त्यांचे पुण्यात आगमन झाले आहे. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये त्यांचे वास्तव्य आहे, असे अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी,निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण पुणे : जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना नुकतेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण समन्वय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी हे प्रशिक्षण दिले.
मतदान करा; सवलत मिळवा पुणे : देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपल्या आठ कोटी ५० लाख ग्राहकांना मतदान करायला प्रोत्साहित करण्यासाठी खास ‘कस्टमर बेनिफिट’ योजना दाखल केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language